Sunday, 10 March 2019

#BLOG7 उन्हाळी मूग, उडीद लागवड



उन्हाळी मूग-उडीदाचे क्षेत्र फार कमी आहे. उडीद, मूग अल्पावधित तयार होणारी (६५ ते ९० दिवस ) पिके आहेत. त्यामुळे ज्वारी, कापुस यासारख्या प्रमुख पिकामध्ये ते आंतरपिक म्हणून घेतात.
या पिकांच्या काढणीनंतर वरांनाजना चारा मिळतो किंवा शेंगा तोडणीनंतर ते जमिनीत बेवड म्हणून गाडल्यास जमिनीचा कस सुधारतो व पुढच्या पिकाला त्याचा लाभ होतो. त्यामुळे उन्हाळी मूग लागवड किफायतशीर ठरते.
स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामान यामुळे उन्हाळ्यात चांगला पोसतो व भरपूर उत्पादन मिळते. शिवाय या पिकावर उन्हाळ्यात रोगाचे प्रमाण अत्यल्प असते. सिंचनाची सुविधा असल्यास उन्हाळ्यात मुगाचे चांगले उत्पन्न मिळते.

हवामान व जमीन
मूग-उडीद ही पिके विशेषतः खरिपात घेतला जातात; परंतु सिंचन सुविधा व सुधारित जाती यामुळे उन्हाळ्यातही या या पिकांची लागवड करण्यास सुरवात झालेली आहे. ही पीके उष्ण हवामानात चांगले येतात. साधारणपणे २१ ते ३५ अंश से. तापमानात या पिकांची चांगली वाढ होते. ६०० ते ७०० मि.लि. पाऊसमान असलेल्या भागात उत्पादन भरपूर मिळते. अति कडाक्‍याची थंडी मात्र पिकास मानवत नाही.

मध्यम ते भारी जमिनीत मूग-उडीद चांगला पिकतो; मात्र जमीन चांगली निचऱ्याची असावी. जमीन सेंद्रिय घटकांचे प्रमाण बऱ्यापैकी असावे.

पूर्वमशागत
अगोदरच्या हंगामातील पीक निघाल्यानंतर वखराच्या साह्याने जमीन भुसभुसीत करावी. जमीन भुसभुसित नसल्यास या पिकांच्या मुळाची वाढ बरोबर होत नाही, व पर्यायाने मुळावरील गाठींची संख्या सुध्दा कमी होते. अगोदर एकरी ४-६ गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून जमिनीत मिसळून द्यावे व नंतर एक कुळवाची पाळी द्यावी.

जाती
मूग- वैभव, फुले एम- 2
उडीद- टीपीयू-4, टीएयू-1

पेरणी
थंडीचा अंमल कमी झाल्यावर उन्हाळी मूग-उडीद यांची फेब्रुवारीअखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करून घ्यावी. जास्त उशिरा पेरणी केल्यास पीक जून-जुलैच्या भर पावसात काढणीस येते. त्यामुळे शेंगाचे नुकसान होण्याची शक्‍यता असते. दोन ओळींत ३० सें.मी. अंतर ठेवून पाभरीने मूग-उडीद पेरावे. एकरी पाच ते सहा किलो बियाणे पुरेसे होते. पेरणी केल्यावर पाणी व्यवस्थित देण्यासाठी चार-पाच मीटर रुंदीचे सारे ओढून घ्यावेत.

बीज प्रक्रिया
मूग-उडीद विशेषतः मूळकुजव्या रोगास बळी पडतो. अशा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे असते. एक किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम किंवा बविस्टिन (काबॅन्डेझिम) याची प्रक्रिया करावी. बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर जिवाणू संवर्धन खतांची बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी रायझोबियम किंवा बायोला हे जिवाणूखत २५ ग्रॅम प्रति किलो बी या प्रमाणात बियाण्यास चोळून बियाणे सावलीत वाळवावे व मग पेरणीस वापरावे.

खत व पाणी व्यवस्थाप
पूर्वमशागतीच्या वेळी पुरेसे कंपोस्ट खत द्यावे. या दोन्ही पिकांना एकरी ८ किलो नत्र आणि ३२ किलो स्फुरद म्हणजेच ४० किलो द्यावे. आवश्‍यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. त्यासाठी पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी माइक्रोला हे द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ये खत ५०० मि.लि., २०० लिटर पाण्यात मिसळून पिकावर पानांच्या दोन्ही बाजूस सायंकाळच्या वेळी फवारावे.

पेरणीनंतर प्रथम तीन-चार दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे. पेरणीपूर्वी रान ओले करून वापरावर आल्यानंतर पेरणी करावी. पहिल्या हलक्‍याशा पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या गरजेनुसार सात ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. एकूण पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या पिकाच्या संपूर्ण कालावधीत द्याव्यात. तुषार सिंचनाचा वापर करून मूग-उडीद भिजविल्यास अधिकच फायदा होतो. विशेषतः पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा तयार होताना पाण्याचा ताण पडू देऊ नये. या काळात जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्‍यक असते.

पीक संरक्षण
या पिंकावर मुख्यतः मावा, पाने खाणारी अळी, पिसू व भुगेंरे या किडीचा प्रादुर्भाव होतो. मावा ही किड पानाच्या खालच्या भागावर बसून रस शोषण करते. त्यामुळे झाडे निस्तेज होतात व दाणे सुध्दा भरत नाहीत. भंगेरे ही पाने कुरडतात. त्यामुळे पानावर छिद्रे पडतात. या सोबतच भूरी हा येरीसायफी पॉलीगोनी या बुरशीमुळे होणारा रोग होतो. ढगाळ व आर्द्र हवामानात यो रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. ६० ते ७० टक्के आर्द्रता व २० अंश २५ अंश.से. तापमानात लाभदायक आहे. मुळकूज हा रोग “रायझोक्टोनिया” नावाच्या बुरशीमुळे होतो. पानावरील चट्टे हा रोग “रायझोक्टोनिया”, “सरकोस्पोरा” व “कोलेटोट्रीकम”इत्यादी वर्गाच्या बुरशीमुळे होतो. केवडा हा विषाणूमुळे होतो. याचा प्रसार उन्हाळी पीकावर जास्त होतो.
किड-रोग प्रतिकारक जातींची लागवड, बीजप्रक्रिया व नियमित निरिक्षण करून वेळोवेळी किड-रोगांचे तज्ञांचा सल्ला घेवून केलेले नियंञण पिक संरक्षाणाच्या दृष्टिने फायद्याचे ठरते.

पिकांची काढणी, मळणी व साठवण
मुगाचे पीक साधारण ६५ ते ९० दिवसात काढणीस येते. वाळलेल्या शेंगा उन्हात चागंल्या वाळल्यानतंर काठीने किंवा बैलाच्या पायाखाली तुडवून मळणी करवी. नतंर उपणनी करून बी अलग करवे. साठवण करण्यापूर्वी बियाणे एक दोन दिवस उन्हात चांगले वाळवावे. साठवणीत भूंगे किंवा सोंडे खूप नुकसान करतात, त्यासाठी साठवण कोरड्या जागेत करावी. साठवणुकी करिता योग्य कोठी किंवा कोठराचा वापर करावा जेणेकरून धान्याला ओलसर हवेमुळे नुकसान होणार नाही. अलीकडे मळणी यंत्राद्वारे/ उडीदाची मळणी केल्या जाते.

वरीलप्रमाणे सुधारित पद्धतीने उन्हाळी मुगाची व उडीदाची लागवड करून जातीपरत्वे 3 ते 5 क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळू शकते.

No comments:

Post a Comment

#BLOG10: वांग्याची लागवड पद्धत

 महाराष्ट्रात वांगी लागवड जवळपास सर्व जिल्ह्यात केली जाते. ⛅ जमीन व हवामान : सर्व प्रकारच्‍या हालक्‍या ते भारी जमिनीत वांग्‍याचे पिक घ...